Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : स्वर्ग-नरक कोठे आहे?

मनुष्याच्या हातात आहे की त्याने आपले जीवन चांगले बनवावे की वाईट.

Published by : Team Lokshahi

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

जेव्हा आपण धर्मग्रंथ वाचतो आणि त्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न करतो तर तेथे आपल्याला सांगितली जाते की आपण आपल्याला जश्या प्रकारे जीवन जगू त्याप्रमाणे आपण मेल्यावर स्वर्ग किंवा नरकात जागा मिळते. तेव्हा मनुष्य विचार करतो की मी काय करू? जसे, की आपण स्वर्गात जावे. लक्षात घेण्याची बाब अशी कि नरकात तर कोणालाही जायचे नाही.

असे सांगितले जाते की नरकात खूप उष्ण वातावरण आहे. खूप दुःख-यातना आहेत. मनुष्याला तेथे खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. यासाठी प्रत्येकाचा असा प्रयत्न असतो की त्याने स्वर्गात जावे. बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की स्वर्ग-नरक कोठे आहे? आपण विचार करतो की स्वर्ग आकाशात कोठे तरी आहे आणि नरक खाली पातळात आहे. आपण विसरून जातो की या पृथ्वीला आपण स्वर्ग बनवू शकतो आणि तिला नरक बनवू शकतो.

हे मनुष्याच्या हातात आहे की त्याने आपले जीवन चांगले बनवावे की वाईट. संत म्हणतात, आपले 75 टक्के जीवन कर्मानुसार चालत असते. परंतु 25 टक्के आपल्या स्वच्छेने जगू शकतो. यामध्ये आपण जीवन चांगले बनवू शकतो किंवा अडचणी निर्माण करू शकतो. तर महापुरुष आपल्याला हेच समजवितात की आपण सद्गुणांनी युक्त जीवन जगावे. एक असे जीवन जगावे ज्यामध्ये प्रत्येक कार्य, प्रत्येक वचन आणि प्रत्येक विचार प्रेमाने पुर्ण असेल, ज्याद्वारे आपण इतरांच्या जीवनात सुख-शांती आणू शकू.

जर आपण इतरांच्या जीवनात सुख-शांती आणली तर आपल्या जीवनात सुख-शांती  आपो-आप यायला सुरुवात होईल आणि हि धरती स्वर्ग जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार