ब्लॉग

‘स्त्री’ने ठरवलं तर, ‘ती’ काहीही करू शकते !

Published by : Lokshahi News

कल्याण : सुराज साधना सुरेश कुटे | हो निश्चितच जग बदलते आहे. पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करत, स्त्री ही आता पुरुषांना खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. 8 मार्च 'जागतिक महिला दिना' निमित्त कर्तृत्वशील स्त्री शक्तीला अभिवादन. इतिहास साक्षी आहे ! आजच्या काळासोबतच पूर्वकालीन जगातही अनेक स्त्रीविरांगणींनी प्रेरणादायक कर्तृत्व आणि नेतृत्व केलं आहे. रावणाच्या बंदिस्ततेमध्ये राहणाऱ्या सीतेने दिलेली अग्नीपरीक्षा, घोर संकटकाळात छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्वाभिमानासाठी तलवार उचलून लढणाऱ्या राणी मनकर्णिका, स्त्री शिक्षणाचा वसा उचलणाऱ्या सावित्रीबाई फुले, एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या जुनको ताबेई, संशोधनासाठी पृथ्वीपासून लाखो मैल दूर अंतरिक्षात जाणाऱ्या वॅलेंटिना तेरेश्कोव्हा, कमी वयात सुद्धा जिद्दी आणि चिकाटीने डॉक्टरकी पदवी मिळावणाऱ्या आनंदीबाई जोशी, अशा अनेक स्त्रिया जगासमोर 'स्त्रीशक्ती'चं उच्चकोटीचं उदाहरण बनून अजरामर झाल्या आहेत.

स्त्रीची नैसर्गिक नाजूक शारिरीक रचना, मनातील भावुकता, हळवेपणा, समाजाकडून होणारी हिडिसपीडीस, त्यांना दिलं जाणारं दुय्यम स्थान, लाचारी, शोषण, मारहाण, या कटू वास्तवतेचा सामना करत, न डगमगता ताठ मानेने ध्येय बाळगणारी, त्यासाठी झटणारी आणि रक्ताचं पाणी करणारी स्त्री एका आलौकिक निसर्गशक्तीचं प्रतीकच म्हणता येईल.

आगामी परिस्थितीचं विश्लेषण पाहता, बदलत्या प्रवाहानुसार आचारविचार ही बदलत चालले आहे. स्त्रियांनी पिंजऱ्यातून निघून मोकळ्या आकाशात जगणं सुरु केलं आहे. त्यांच्या कारकीर्द वाढत चालल्या आहे. लिंगभेद संपुष्टात येताना दिसेतेय. कारण 'चूल आणि मुल' या मर्यादा ओलांडून त्यांच्यातील सामर्थ्य जगाला प्रखरपणे दाखवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढते आहे. "ये हम भी कर सकते है !" असं ठासून म्हणणाऱ्या ऊर्जायुक्त स्त्रीप्रजातिचा उगम होत आहे.

नोकरी, व्यवसाय, शेती, संशोधन, सैन्य, कला, क्रीडा प्रत्येक ठिकाणी विजयी झेंडा स्त्रीच्या हातून फडकवल्या जात आहे. निथळ पाण्यासारखं चित्र जगाला दिसत आहे की, प्रबळ इच्छाशक्ती, अफाट सहनशीलता, उत्तुंग प्रेमवाहक, वीरकथांसोबत प्रेमकथांना अंकुरित करणाऱ्या 'स्त्री'ने ठरवलं तर 'ती' काहीही करू शकते !

स्त्री म्हणजे कोण ?

स्वतः त्रासात राहून,
तुम्हाला नऊ महिने पोटात बाळगणारी…
आई वडिलांचा त्याग करून,
विवाहानंतर तुमच्या घरी येणारी…
तुम्हाला गरज असताना,
तुमच्यावर प्रेमाचा आणि स्नेहाचा वर्षाव करणारी…
आयुष्याच्या बिकट काळात,
तुमचा हात धरून तुम्हाला धीर देणारी…
स्वतःच मन राखून,
तुमच्या कुटुंबाचा समतोल राखणारी…
स्वतःचं स्वप्न सावटून,
तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी जगणारी…
प्रपंच नेटका करताना,
स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करणारी…
कितीही असेल दुःख,
तरी ते पचवून खळखळून हसणारी…
'ती' म्हणजे 'स्त्री' !

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर