CST Station 
ब्लॉग

मराठीपण हरवेलली मुंबई!

Published by : Vikrant Shinde

भाजपाचे(bjp) लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील, हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत(sanjay raut) यांचे वाक्य आजच्या परिस्थितीचे वास्तव दाखवून देतंय… दोन दशकांपूर्वी मुंबई शहरावर चित्रित करण्यात आलेल्या सत्या(satya) चित्रपटातील नायक भिकू म्हात्रे मुंबई का किंग कौन? असा प्रश्न विचारून स्वतः मुंबईचे राजे असल्याचे सांगतो… तेव्हाच्या परिस्थितीत मुंबई खरोखरीच मराठी माणसांच्या हक्काची आणि त्यांच्याच हाती होती. या वास्तवतेतील राजकारणा आपण बाजुला ठेवलं तर सध्या मुंबईचे मराठीपण आपण केव्हाच हरवून बसलोय, यावर कोणाचे दुमत असणार नाही… मुंबई (mumbai) हे बंदराचे शहर असल्यामुळे साहजिकच येथे व्यापऱ्यांची ये-जा अधिक होती… त्यानंतर इंग्रजांच्या काळात हे उद्योगधंद्यांचे प्रमुख शहर बनले… बहुभाषिकांचे शहर म्हणून त्याची गणना होवू लागली… मात्र त्यावेळी मुंबईचे मराठीपण जपले जात होते…काळानुरूप मुंबईतून मराठी भाषा, मराठी माणूस या शहरापासून दूर झाले…. त्याला प्रमुख कारण ठरले मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून येवून येथील कापडाच्या गिरणीत(mills) काम करणारा गिरणी कामगार संपामुळे मुंबई बाहेर फेकला गेला… त्यावेळी हजोरोच्या संख्यने मराठी गिरणी कामगारांची कुटुंबे उध्दवस्त झाली… त्यानंतर मुंबईत अन्य राज्यातून येणाऱ्या कष्टकऱ्यांचा भरणा वाढला…महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत अधूनमधून परप्रांतीयांच्या विषयाला उकळी फुटत असते. पण ती केवळ राजकीय ठरत गेली… मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी निर्माण झालेल्या शिवसेना पक्षाने त्यावेळी मुंबईत येणाऱ्या दाक्षिणात्य लोकांविरोधात मोठा लढा उभारला होता.. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमधून येणाऱ्यांविरोधातही आवाज उठवला… पण, तो लढा कालांतराने राजकीय वळणावर गेला… शिवेसेनेतून बाहेर पडेलल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(mns) हा मुद्दा लावून धरला.. त्यांच्या परप्रांतीय धोरणाच्या मुद्यावर देशभरातून टिकाही झाली पण त्यांनी स्थानिकांना रोजगारात प्राधान्य हवंय ही मागणी पुढे करून त्यांनी परप्रांतीयविरोधातील लढा सुरू ठेवला.. आगामी मुंबई-ठाणेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता मनसे त्यांच्या या मुद्यावर किती आक्रमक राहिल याबाबत आता साशंकता आहे… गेल्या काही दिवसात मनसे भाजपासोबत निवडणुकांना सामोरी जाणार अशा राजकीय चर्चा आहेत. भाजपाने मनसेला त्यांचा परप्रांतीयांबाबतचा मुद्दा सौम्य करण्याच्या सूचना केल्या आहेत… येत्या दोन दिवसांनी मराठी भाषा दिन आपल्याला साजरा करायचा आहे… त्यासाठी आपण दरवर्षी मराठी भाषा जपण्याचे आणि तिचे संवर्धन करण्याची आश्वासने देत-घेत असलो तरी आजपर्यंत आपण आपल्याच मातृभाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यास असमर्थ ठरलो आहोत… यावेळी पुन्हा राज्य सरकारने अभिजात मराठीच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे… आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनीही दिली आहे.. मराठी भाषेचा हा सुवर्ण दिवस कधी उगावतो त्याकडे मराठी जनांचे लक्ष आहे… एकूणच मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसांना त्यांच्या न्यायासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे… स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मराठी माणसांना आता राजकीयदृष्ट्या हद्दपार व्हावे लागणार आहे… गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर झालेल्या सर्व्हेमधून मुंबई शहरातून मराठी टक्का कमी होत चाललाय हे सिध्द होतंय… याला कारणीभूत आपला मराठी माणूसही आहे… आपण कोणत्याही कष्टाच्या कामासाठी पुढे नसतो.. आज परप्रांतीय जी कामे करतात, उदा. इस्त्रीपासून ते भाजी विक्रिपर्यंत आणि रिक्षापासून ते हातगाडी ओढण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या कामांना त्यांचा होकार असतो. कारण ते या मुंबईत रोजगारासाठी आले आहेत.. पडेल ते काम आणि असेल त्या स्थितीत जगण्याची त्यांची तयारी असते…. आपला मराठी माणूस येथेच कमी पडतो, असाही एक अहवाल आहे… याचा अर्थ मराठी माणूस मेहनत करत नाही असा अजिबात नाही.. त्याच्या बुजऱ्या स्वभावामुळे तो मागे पडत गेला आणि आपल्याच काही राजकारण्यांनी त्यांची वोट बँक वाढवण्यासाठी परप्रांतीयांच्या वस्त्यांचा आधार घेतला… मुंबई आणि उपनगरात गेल्या 20-25 वर्षात जेवढ्या वस्त्या वसल्या गेल्या त्यांना आपल्याच मराठी राजकारण्यांनी अभय दिले आहे… याबाबत राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांनी आपलेच राजकारणी प्रशासनाला हाताशी धरून कशापध्दतीने मुंबईला अनधिकृतेचा विळखा पाडताहेत याचे चित्रिकरण दाखवले….त्यानंतरही मुंबईत राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरून झोपडपट्टी दादांनी काही शे रूपयांसाठी परप्रांतीयांच्या वस्त्या-झोपडपट्टया वाढवल्या… राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणल्यावर झोपड्या कमी होण्याऐवजी त्या वाढल्यात.. या झोपड्यांमधील टक्केवारी पाहिली तर ती परप्रांतीयांचीच दिसून येते…आता मराठी माणूस मुंबईबाहेरच्या उपनगरात वसलाय… राजकीय व्यासपीठावर मराठी माणूस आणि मराठीपण यावर टाहो फोडला जात असला तरी हीच मराठी राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी ज्यांना विरोध करतात त्यांच्याच दारादारात फिरताना आणि त्यांनी नियमांची पायमल्ली करत पायभूत सोयीसुविधा पुरवण्यात मशगूल असतात…

-नरेंद्र कोठेकर

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या