छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय नातीला लग्नासाठी विकायला काढल्याच्या घटनेने संतापची लाट उसळली आहे. एका 25 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाकडून 2 लाख रुपये घेऊन 14 वर्षीय नातीचे लग्न लावले. नवऱ्याने तरुणीला शरीर सुखासाठी त्रास देण्यास सुरुवात केली असता, तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली.
नेमंक प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी १० वर्षाची असताना पीडित मुलीचे वडील वारले. मुलीची आई मुलीला सोडून गेली. तेव्हापासून मुलगी आजी- आजोबा आणि काकाकडे राहत होती. काका, आजी- आजोबांना नात नकोशी झाली होती. त्यामुळे एका 25 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाकडून 2 लाख रुपये घेऊन 14 वर्षीय मुलीच्या कुटुंबाने तिचे त्या तरुणासोबत लग्न लावून दिले. २ महिने नवरा शारीरिक सुखासाठी १४ वर्षीय मुलीला त्रास देऊ लागला. त्रास असह्य झाल्यामुळे मुलीने पोलिसांकडे मदत मागितली. तपासादरम्यान लक्षात आले की, ही मुलगी अल्पवयीन आहे. दामिनी पथकाकडून मुलीची सुटका करण्यात आली आहे.