सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालेल्या आहेत. अशातच अयोध्येमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत अत्याचारी रावण मोकाट फिरत आहेत. अयोध्येतून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २२ वर्षीय लेकीवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुषपणे निघृण हत्या करण्यात आली.
या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. एका नाल्यात हात-पाय बांधून निर्वस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचे दोन्ही डोळे काढण्यात आले आहेत. त्याचसोबत तिच्या शरीरावर गंभीर जखमा करण्यात आलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, भागवत कथेसाठी ही तरुणी घरातून गेली होती आणि घरी परतलीच नाही.