सांगली खोतवाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास हिट अँड रन ची थरारक घटना घडली आहे. वाहन चालकाने रस्त्यावरील आठ ते दहा दुचाकींना उडवले आहे. या घटनेत पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाल्याचे झाले आहेत. दुचाकीसह चारचाकीचे ही मोठे नुकसान झाले आहे. याचपार्श्वभूमिवर माधवनगर आणि बुधगावच्या नागरिकांसह वाहनधारकांनी गाडीचा पाटलाग केला.
दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांनी रात्री तात्काळ धाव घेऊन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. नितेश पाटील असे चालकाचे नाव असून तो आटपाडी तालुक्यातील आहे. पाटील हा रात्री चारचाकी घेऊन माधवनगर ते बुधगाव या रस्त्याने रात्री निघाला होता. त्यानंतर रस्त्यावरील वाहनांना जोराची धडक दिली आणि एका कमानीला जाऊन धडकला. या अपघातात जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.