Crime

KEM Hospital : धक्कादायक ! केईएम रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल

सहा महिला डॉक्टरांनी केली डॉक्टर रवींद्र देवकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे .

Published by : Shamal Sawant

राज्यामध्ये सध्या महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. असाच एक प्रकार आता मुंबईमधील केईएम रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी एका वरिष्ठ डॉक्टरवर विनयभंगाचा आरोप केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सहा महिला डॉक्टरांनी केली डॉक्टर रवींद्र देवकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे . भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपानंतर डॉक्टर रवींद्र देवकरला निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई महापालिका तसेच हॉस्पिटलची अंतर्गत तक्रार समितीने देखील केली चौकशीला सुरुवात केली. सहा महिला डॉक्टरांनी हॉस्पिटलचे डीन आणि फॉरेनची मेडिसिन डिपार्टमेंटच्या प्रमुखांकडे तक्रार केली. डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.

चौकशी सुरु :

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. देवकर यांना कोणत्याही शैक्षणिक किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. या प्रकराची आता चौकशी समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल, असे केईएमकडून स्पष्ट करण्यात आले. या धक्कादायक घटनेमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा