Crime

Jalgaon Crime News : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून; पत्नीवर गंभीर आरोप, जळगाव हादरलं

जळगाव क्राइम: कौटुंबिक वादातून तरुणाचा निर्घृण खून; पोलिस तपास सुरू.

Published by : Team Lokshahi

जळगाव शहरातल्या कालिका माता मंदिर परिसरात एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली. मृत आकाश पंडित भावसार यांच्या कुटुंबियांनी पत्नी पूजा हिच्यावर आणि पूजाच्या सख्ख्या मावस भावावर गंभीर आरोप करत, खून घडवून आणल्याचा दावा केला आहे. शनिवारी (3 मे) रात्री 11 वाजताच्या सुमारास एका ए वन हॉटेलजवळ आकाशवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. मांडी, छाती आणि गुप्तांगावर गंभीरवार करून, त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात आकाशचा जागीच मृत्यू झाला.

शनीपेठ पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. आकाशच्या आई, बहिण आणि मेहुण्याने सांगितले की, पूजाचे तिच्या सख्ख्या मावस भावाशी अनैतिक संबंध होते. याच कारणातून आकाशचा जीव गेला असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच, खून होण्याआधी आरोपी आकाशला शोधण्यासाठी त्याच्या मूळ गावात गेले होते. मात्र तो जळगावात असल्याची माहिती पूजानेच दिल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

आकाश नगरमध्ये ट्रान्सपोर्ट एजंट म्हणून काम करत होता. मागे पत्नी, दोन मुलं, आई आणि बहिण असा त्याचा परिवार आहे. कुटुंबीयांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण अधिक तापलं होतं. ही घटना केवळ कौटुंबिक वादापुरती न राहता, सामाजिक आणि नैतिकतेच्या पातळीवर अनेक प्रश्न उभे करते आहे. पोलीस तपास सुरू असून पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा