सिद्धेश म्हात्रे | नवी मुंबई | गव्हाण गावात 38 तोळ सोन चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा न्हावाशेवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोणतेही धागेदोरे नसताना तांत्रिक महितीच्या आधारे तपास केला असता पोलिसांना देखील चक्रावून टाकणारी माहिती समोर आली.
घरफोडी प्रकरणातील आरोपी आदेश कोळी याने प्रथम ज्या घरात चोरी करायची आहे. त्या घराची रेकी केली, त्यानंतर त्याच घरातील एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडून घराची सर्व माहिती घेतली. यानंतर संधी मिळताच घरातील सर्व दागिने लंपास करून पळ काढला. प्रथम तर पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र तांत्रिक तपास केला असता, मुलीच्या मित्रावर संशय बळावत गेला आणि अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपीने सर्व दागिने विविध ज्वेलर्सला विकले होते. हे सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले. एकूणच घरफोडी करण्यासाठी अतिशय शिताफीने प्रेमाचे जाळे विणल्याने आरोपीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलिसही चक्रावून गेलेत. याप्रकरणी आरोपी आदेश कोळी याच्यासह, आरोपीस मदत करणाऱ्या तक्रारदार यांच्या 19 वर्षीय मुलीला देखील नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.