A girl appearing for her 12th standard exams in Arde village in Jawali taluka of Satara district had left home for an extra hour. 
Crime

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील दोन घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण

जावळी तालुक्यातील आर्डे गावातील बारावीची परीक्षा देणारी एक मुलगी अतिरिक्त तासासाठी घराबाहेर पडली होती. रस्त्यात हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने तिला सोबत येण्याची ऑफर दिली.

Published by : Riddhi Vanne

जावळी तालुक्यातील आर्डे गावातील बारावीची परीक्षा देणारी एक मुलगी अतिरिक्त तासासाठी घराबाहेर पडली होती. रस्त्यात हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने तिला सोबत येण्याची ऑफर दिली. काही वेळानंतर तिला शुद्ध राहिली नाही.

शुद्धीवर आल्यावर ती थेट पुणे रेल्वे स्थानकाजवळ असल्याचे तिला कळले. धीर न सोडता तिने एका अनोळखी व्यक्तीचा फोन घेऊन घरी संपर्क साधला. कुटुंबीयांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. तपास सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला जात आहे.

तरुणाची अमानुष हत्या

फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे २७ वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस असे मृताचे नाव आहे. दगडांनी मारहाण करून त्याचा जीव घेतल्यानंतर आरोपींनी पुरावे लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दोन्ही घटनांमुळे सातारा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

थोडक्यात

  • मुलगी अतिरिक्त तासासाठी घराबाहेर गेली

  • रस्त्यात हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने तिला सोबत येण्याची ऑफर दिली

  • काही वेळानंतर मुलगी शुद्ध राहिली नाही

  • शुद्धीवर आल्यावर तिला पुणे रेल्वे स्थानकाजवळ असल्याचे लक्षात आले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा