Crime

Pune Crime : बँकेचा मॅनेजरच विश्वासघातकी निघाला, वयोवृद्ध दाम्पत्याची 2 कोटींची फसवणूक करून ऑडी कार खरेदी

पुणे गुन्हा: रिलेशनशिप मॅनेजरने वृद्ध ग्राहकांची 2 कोटींची फसवणूक केली, ऑडी कार जप्त.

Published by : Team Lokshahi

पुण्यामधील एका खाजगी बॅंकेतील रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने वृद्ध दांपत्याची फसवणुकीचा धक्कादायक प्रकार केला. त्यांच्या खात्यातून परस्पर सुमारे 2 कोटींची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डेक्कन पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे. आकाशसिंह सुरेशसिंह राणा (वय ३४, मूळ राहणार इंदूर, मध्यप्रदेश, सध्या बाणेर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सध्या सिंगापूरमध्ये वास्तव्यास असून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नावे भारतात गुंतवणूक केली होती. यासाठी त्यांनी बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरवर विश्वास ठेवला होता. मात्र, आरोपी राणाने या विश्वासाचा गैरफायदा घेत वृद्ध दांपत्याची आर्थिक फसवणूक केली. जून २०१८ ते मार्च २०२३ दरम्यान, कोविड महामारी आणि वयानुसार आलेल्या अडचणींचा फायदा घेत आरोपीने त्यांच्या खात्याचा तपशील मिळवला. त्यानंतर त्याने ऑनलाइन व्यवहार, एटीएमद्वारे रक्कम काढणे आणि प्रत्यक्ष रोख स्वरूपात पैसे उचलून एकूण १ कोटी ६५ लाख ८२ हजार रुपये चुकीचा वापर केला.

फिर्यादी २८ मे रोजी भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या आर्थिक व्यवहारांची पाहणी केली. त्यानंतर मॅनेजरने सुमारे ५१ लाख रुपयांचा चुकीचा व्यवहार झाल्याचा निदर्शनास आले. त्यानंतर चौकशी केली असता आरोपीने या पैशांचा वापर स्वत:साठी केला. त्याने महागडी ऑडीकार खरेदी केली. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी ती कार आता जप्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा