Crime

Crime News : केरला स्टोरीची पुनरावृत्ती? आधी शारिरीक संबंध, नंतर व्हिडीओ बनवले; हिंदू मुलीने सांगितली आपबिती

भोपाळ: हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शारिरीक संबंध, व्हिडिओ, धर्मांतरासाठी दबाव; आरोपी अटकेत.

Published by : Team Lokshahi

मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवून तिला आणि तिच्या बहिणीला आमली पदार्थाचे सेवन घेण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच त्यांना मासांहार खाण्यास भाग पडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला पकडले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलीने दिलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, भोपाळमधील रायसेन रोडवरील एका खाजगी महाविद्यालयामध्ये पीडित मुलगी शिकत होती. पहिल्या वर्षी तिची आणि आरोपी फरहानची मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू दोघेही बोलू लागले. एप्रिल 2022 मध्ये आरोपी फरहान पीडितेला जहांगीरबादमधील हमीद नावाच्या मित्राच्या घरी घेऊन गेला. तिच्यासोबत शरीरसंबध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर पीडितेला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केलं. आरोपीच्या मित्रांनी पीडितेला उपवास करण्यास सांगितले. तिला जबरदस्ती मांसाहार करण्यास सांगितले. एवढेच नाही तर, तिला बुरखा घाल असं सांगण्यास सुरुवात केली. एकदा पीडितेने बूरख्यातील स्वत:चा फोटोही आरोपीला पाठवला.

काहीदिवसांनंतर आरोपी पीडितेलाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राहिला. त्यानंतर गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पीडित मुलगी आरोपी फरहानसोबत त्याचा मित्र अबरारच्या घरी गेली, जिथे त्याने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर पीडितेची लहान बहीण फरहानचा मित्र अली याच्या संपर्कात आली. त्यांची ओळख प्रेमसंबधात निर्माण झाली. अलीने जूनमध्ये लहान बहिणीसोबत शारीरिक संबध ठेवला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. दरम्यान आरोपीने दोन्ही बहीणांना अबरारच्या घरी बोलवले. तिथे दोघींना जबरदस्तीने ड्रग्ज पाजण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला आणि त्याचासुद्धा व्हिडिओ बनवण्यात आला होता. यानंतर मात्र दोन्ही बहिणींनी कॉलेजला जाणे बंद केले.

पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती एका तरुणामार्फत मिळाली, ज्याला पीडितेने सदर प्रकरण सांगितले होते. तरुणाने पोलिसांना माहिती दिली, पोलिसांना पीडितेला तिचे नाव कुठेही येणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर पीडितेने एफआयआर दाखल केला. पोलिसांनी प्रथम गुप्तपणे सर्व आरोपींची ठिकाणे शोधली, त्यांच्यावर लक्ष ठेवत, संधी मिळताच त्यांना पकडले. सर्वप्रथम त्यांचे फोन काढून घेतले जेणेकडून त्यांनी व्हिडिओ व्हायरल करु नयेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा