कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हातकणंगले तालुक्यातील निजामीया मदरशा येथे एका 11 वर्षांच्या मुलाला शॉक देऊन त्याची हत्या करण्यात आली. 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला शॉक देऊन त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे हातकणंगले परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील हातकणंगले -वडगांव रस्त्यावर धार्मिक शिक्षण देणारं निजामीया मदरसा आहे. तिथे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणानंतर सर्व मुले झोपण्यास गेली. मात्र त्यानंतर सोमवारी पहाटे 14 वर्षांच्या वारीस वकील आलम या मुलाने 11 वर्षांच्या फैजान नाजीला वीजेचा शॉक दिला आणि त्याचा खून केला. जेव्हा ही माहिती तेथील कर्मचाऱ्यांना कळली तेव्हा तात्काळ फैजानला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी फैजानला मृत घोषित केले. फॉरेन्सीक विभागाकडून मिळालेल्या माहितीतून फैजानला शॉक देऊन मारल्याचे निष्पन्न झाले.
सुट्टी मिळवण्यासाठी केला खून
14 वर्षाच्या वारीस वकील आलम याला मदरशामधून सुट्टी हवी होती. मदरशा बंद पडून सुट्टी मिळवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. सुरुवातीला सोमवारी मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली गेली. मात्र त्यानंतर त्याच्या हाता-पायाला असलेल्या खुनामुळे
त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले. त्यासाठी फैजानच्या शवाची फॉरेन्सीक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हे भयानक कृत्य समोर आले. ब्लेड , वायर , या साहित्याचा वापर करून तसेच शॉक दिल्यावर फैजान ओरडू नये, यासाठी त्याचे तोंड बंद करण्यात आले. अश्या नियोजनबध्द पध्दतीने हा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे हातकणंगले परिसरात प्रचंड खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.