Crime

Dombivli Crime : 15 वर्षीय मुलीचं अपहरण,अत्याचार, गर्भपातानंतर वेश्याव्यवसाय...पुढे जे घडलं ते ऐकून तुमचंही मन हेलावेल

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला. यात तिच्या गर्भपातानंतर तिला वेश्याव्यवसाय ढकलण्यात आलं, यासंदर्भात पोलिसांनी 4 जणांना अटक केली.

Published by : Prachi Nate

डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातून गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन त्याने गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवण्यात आलं.

या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. या काळात देखील तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरूच होता. एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, आणि अखेर टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत पीडित मुलीची सुटका केली.

पोलिसांनी महिलेसह तिचा पती, दोन पुरुष, अशा 4 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणात मुलीला पळवून नेणारा आरोपी आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे. तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा