Crime

Uttar Pradesh Aligarh : शिक्षकाच्या प्रेमात तिनं गाठलं हॉटेल, थोड्या वेळात असं काही घडलं की...

अलिगडमधील एका शिक्षिकेने आणि अल्पवयीन विद्यार्थिनीने प्रेमप्रकरणामुळे हॉटेलच्या खोलीत एकत्र आयुष्य संपवले, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Published by : Prachi Nate

उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे घडली आहे. 5 मे 2025 रोजी, दुपारी 3 ते 4 च्या सुमारास उत्तर प्रदेशच्या अलीगढच्या खेरेश्वर स्क्वेअर येथील हॉटेल द रॉयल रेस्पिटच्या 204 रुम नंबरमध्ये दोन जणांचा मृतदेह सापडला.

हा मृतदेह एका अल्पवयीन मुलीचा आणि एका मुलाचा होता. विशेष म्हणजे, ही मुलगी 14 वर्षाची होती तर तो मुलगा 24 वर्षाचा होता. मिळालेल्या माहितीनुसार असं समोर आलं आहे की, दोघांनीही प्रेमप्रकरणामुळे आपल जीव संपवला होता. मात्र हे समजलं कस? आणि या दोघांमध्ये वयाचा एवढा फरक असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण कसे झाले? तसेच दोघांच्याही मृत्यूचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

नेमकं प्रकरण काय?

अलीगढमधील ज्वालाजीपुरम भागात मृत मुलगा चंद्रभान राहत होता, तो वयवर्षे 24 होता. तो एका शाळेत शिक्षक होता, एवढच नव्हे तर तो त्याच्या घरी लहान मुलांचा क्लास देखील घ्यायचा. त्याचठिकाणी 14 वर्षांची मुलगी राहायची जी त्याच्याकडे क्लासला देखील जायची. त्यांच्यातील शिक्षक आणि विद्यार्थिनीचं नात हळूहळू वेगळच वळण घ्यायला लागलं होत. त्यांच्यामध्ये काही काळाने प्रेमसंबंध निर्माण झाले, आणि म्हणतात ना अशा गोष्टी जास्त काळ कोणापासून लपून राहत नाहीत. असंच काहीस झालं चंद्रभान आणि त्या अल्पवयीन मुलीसोबत. त्यांच्या नात्याची माहिती त्यांच्या कुटुंबापर्यंत पहोचली. त्यांच हे नात त्यांच्या कुटुंबाला मान्य नव्हत, त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांना समजवलं. अल्पवयीन मुलीच्या आईने तिची शाळा आणि क्लास काही दिवसांसाठी बंद केली.

त्यानंतर दोघांनी त्यांच्यातील असणाऱ्या नात्याला पुर्णविराम लावला. यानंतर सर्व काही पुर्वीसारख नॉर्मल सुरु झालं. मुलगी तिच्या आईला सांगून शाळेत जाऊ लागली तर चंद्रभान देखील आपली शिक्षकाची नोकरी करु लागला. पण म्हणतात ना खरं प्रेम कधीच संपत नाही, कुठे ना कुठे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल भावना टिकलेल्या होत्या. दोघांनी ही बाहेर भेटण्याचा निर्णय केला. 5 मे रोजी सकाळी विद्यार्थिनी शाळेचं नाव सांगून घरातून बाहेर पडली आणि चंद्रभानला भेटली. त्यानंतर दोघेही हॉटेल द रॉयल रेस्पिटमध्ये 204 रुमनंबरमध्ये गेले. यावेळी चंद्रभानने त्याचा खरा आयडी दिला होता. मात्र अल्पवयीन मुलीने तिच नाव मुस्कान राणा असून ती 2002 मधली असल्याची खोटी माहिती दिली तसा आयडी देखील बनवून घेतला. तिच आयडीवरील वयवर्ष पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना खोलीची चावी दिली. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही खोली बुक करण्यात आली होती.

तर दुसरीकडे विद्यार्थिनीच्या आईला तिच्या शाळेतील मैत्रिणीकडून समजले की ती शाळेत आलीच नाही. ही गोष्ट कळताच तिच्या आईने तिची शोधाशोध करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र तिचा काही पत्ता लागला नाही. इथे अर्ध्या तासाने चंद्रभानने दिल्लीतील त्याच्या एका मित्राला फोन करुन सांगितलं की, तो खूप अस्वस्थ आहे, आणि याच विचाराने तो त्याच काही तरी बर वाईट करण्याचा प्रयत्न देखील करु शकतो. हे ऐकून त्याच्या मित्राने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच काहीही न ऐकता चंद्रभानने फोन कट केला. चंद्रभानच्या दिल्लीच्या मित्राने अलीगढमधील त्याच्या दुसऱ्या मित्राला फोन करून हॉटेलचा पत्ता सांगितला आणि लगेच तिथे जाण्यास सांगितले. मित्र हॉटेलवर जाताच त्याने जे पाहिलं ते फारचं धक्कादायक होत. चंद्रभान आणि अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला होता. त्या दोघांनी विष प्राशन करुन एकत्र आपला आयुष्याची अखेर केली.

मृत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबात आजी-आजोबा, आई आणि 10 वर्षांचा धाकटा भाऊ आहे. तिला वडील नाहीत आणि आई खासगी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवते. तर मृत चंद्रभान हा बी.टेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता, त्याला तीन लहान बहिणी होत्या. अभ्यासासोबतच चंद्रभान त्याच परिसरातील एका शाळेत शिकवत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य