दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली. कन्नड सिनेविश्वातील अभिनेत्री रान्या राववर सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. रान्या राव ही सतत दुबईला प्रवास करत असल्याने पोलिसांना तिच्यावर संशय होता.
10 मार्चला रात्री बंगळुरु येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री रान्या राववर कारवाई करण्यात आली. तिच्याकडून तब्बल 14.8 किलो सोनं जप्त करण्यात आले. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार रान्या रावला महसूल गुप्तचर संचालनयाने अटक केली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबई- भारतादरम्यान तस्करी करत असलेल्या टोळीमध्ये ती सहभागी होती. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
नेमंक प्रकरण काय?
३३ वर्षीय रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. ते कर्नाटक राज्य, पोलिस गृहनिर्माण महामंडळात पोलिस महासंचालक (DJP)पदावर कार्यरत आहेत. रान्या राव ही दुबईतून बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. ती सतत प्रवास करत असल्याने तिच्यावर कोणीतरी नजर ठेवत होते. पोलिसांना रान्यावर संशय आला. सोमवारी ती भारतात आल्यानंतर तिच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली. कारवाईदरम्यान असे लक्षात आले की, बरेच दिवस ती सोन्याच्या तस्करीमध्ये सहभागी होती. तपासादरम्यान तिच्या कपड्यांच्या आतील बाजूस सोन्याचा मुलामा असल्याचे दिसत आहे. रान्याकडून तब्बल 14.8 किलो वजनाचे सोने सापडले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.