अकोला जिल्ह्यामध्ये ९ सप्टेंबर २०२४ रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. अकोल्यातील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. पीडीतेच्या मैत्रिणेने विश्वासघात करुन तिला देहविक्रीच्या व्यवसायामध्ये ढकलण्याचा प्रकार जुने शहरात घडली. पीडीतेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मैत्रिणीने तिला एका ठिकाणी बोलवलं होतं. याच ठिकाणी अल्पवयीन मुलीला शीतपेयाद्वारे गुंगीच औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना अकोल्यात घडली. या घटनेतील एक आरोपी बंटी फरार होता. या आरोपीला आता खामगावमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अकोल्यातील जुने शहरामध्ये एक मुलगी दहावीच्या शिक्षणासाठी अकोला शहरात आली होती. पीडीतेचा वाढदिवस असल्याने तिच्या आरोपी मैत्रिणीने तिला एका ठिकाणी बोलावलं होतं. त्याठिकाणी आरोपी मैत्रिण आणि तिचे मित्र देखील उपस्थित होते. आरोपी मित्रांनी पीडीतेच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. शीतपेय पीताच तिला गुंगी येऊ लागली. त्यानंतर एका आरोपी मित्राने पीडीतेवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथे उपस्थित मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. ही सर्व घटना आरोपी मैत्रिणीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन पीडीतेला धमकवण्यात सुरुवात केली. त्यानंतर पीडीत मुलीला देहविक्री व्यवसाय करण्यासाठी ढकललं गेलं. चारही आरोपींवर पोस्को अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यामधील एक आरोपी बंटी सटवाले फरार होता. या फरार आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या आरोपीला खामगाव येथून अटक केली आहे.