Breaking news  
Crime

Breaking News : मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवल्याचा रागातून डॉक्टर महिलेच्या डोक्यात पतीने घातला खलबत्ता

आरोपी पतीविरोधात गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवल्याचा रागातून डॉक्टर महिलेच्या डोक्यात पतीने घातला खलबत्ता

  • बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू

  • आरोपी पतीविरोधात गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता

(Breaking News) अंबरनाथमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीने गंभीर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खलबत्त्याने डोक्यावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्या सध्या बदलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. किरण यांच्या तक्रारीनंतर त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिम येथील मोहन सबर्बिया निवासी संकुलात पती विश्वंभर शिंदे आणि दोन मुलांसोबत राहतात. बुधवारी पहाटे त्या नेहमीप्रमाणे गायनाचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि नंतर पतीसाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेल्या. याचवेळी पूर्वीपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर विश्वंभर यांनी अचानक किचनमध्ये घुसत किरण यांचा गळा पकडला आणि खलबत्त्याने डोक्यात प्रहार करत मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किरण यांनी मदतीसाठी ओरडले. त्यांचा आवाज ऐकून दोन्ही मुले किचनमध्ये धावून आली आणि आईची सुटका केली. रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन किरण शिंदे यांचा जबाब नोंदवला आहे. “या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता. पतीवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी,” अशी मागणी त्या करत आहेत.

घटनेच्या कारणाबद्दल बोलताना किरण म्हणाल्या की, माथेरानला गेलेल्या एका सहलीनंतर त्यांच्या शालेय मित्राने पाठवलेल्या मेसेजबद्दल पतीला संशय होता आणि त्यातूनच हा हल्ला झाला. त्या पुढे म्हणाल्या, “मी मुलांसाठी अनेकदा समजूत काढत सहन केलं, पण यावेळी मर्यादा ओलांडल्या गेल्या. आता न्याय मिळालाच पाहिजे.” या प्रकरणाचा अंबरनाथ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपी पतीविरोधात गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा