मुंबईतील काळाचौकी परिसरातील धक्कदायक घटना घडली आहे. मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका व्यक्तीने महिलेवर जिवघेणा हल्ला करून स्वत:ला मारून घेतल्याची घटना समोर आली आहे. काळाचौकी परिसरात प्रेमप्रकरणातून भररस्त्यात तरुणीवर जिवघेणा हल्ला केला असून हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाला आहे.
मृत तरुणाचे नाव सोनू बरई आहे. तर जखमी मुलीचे नाव हे मनिषा यादव आहे. मृत तरुणाने शेवटचे भेटण्यासाठी मुलीला नर्सिंग होममध्ये बोलावले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला यावेळी राग अनावर झालेल्या तरुणाने मुलीवर धार धार शस्त्राने वार केले. मुलीवर हल्ला केल्यानंतर त्याच शस्त्राने तरुणाने स्वत:ला मारून घेत आयुष्य संपवले. मुंबईतील चिंचपोकळी काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काळाचौकी पोलीस ठाण्याच्या दिशेहून चिंचपोकळी स्थानकाच्या दिशेने एक तरुण आणि तरुणी जात होते.
त्यावेळेस तरुणाने तरुणीवर हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवायला तरुणीने नर्सिंग होमचा सहारा घेतला होता. तरुण आणि तरुणी दोघांचे प्रेमसबंध होते. आठ दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत सबंध आहेत, असा तरुणाला संशय होता. याच संशयावरूने तरुणाने तरुणीवर हल्ला केला. नरसिंग होममध्येच तरुणाने तरुणीवर जिवघेणा हल्ला केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली.
तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्या तरुणाने देखील गळा चिरुन स्वत:ला संपवलं आहे. प्रेमसंबंधातील वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी दोघांना तात्काळ उपचारासाठी टॅक्सीतून केईएम रुग्णालयात दाखल केले. काळाचौकी पोलीस आणि परिमंडळ 4च्या पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत.