बीड जिल्ह्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र हादारुन गेला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बीडमध्ये राहिली आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आता अशातच बीडच्या आष्टी तालुक्यात पुन्हा एखादा धक्कादायक समोर आली आहे. कडा गावातील लोणीमध्ये जमिनीच्या वादातून मारहाण केली गेली आहे.
आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद वीर गावात शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. जमिनीच्या वादातून तीन पुतण्यांसह तीन सुना अशा सहा जणांचा कोयता लोखंडी पाईप त्याचबरोबर धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या छभू देवकर वय वर्ष बहात्तर या चुलत्याचा अहिल्यानगर येथील रुग्णालयात रविवारी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली असावी. याप्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये सहा आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्ती वरती पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नेमकं प्रकरण काय?
आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मिरी येथील देवकर कुटुंबामध्ये अनेक दिवसापासून शेतातील बांधाच्या कारणावरून वाद होत होते. पाईपलाईनच्या कारणावरून धसपूस सुरू होती. शनिवारी सायंकाळी घरासमोर सहा वाजता लहान मुले चेंडू खेळत असताना झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन तीनही पुतण्याने व सुना अशा सहा जणांनी मिळून कोयता लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत छबू देवकर वय 72 हे गंभीर जखमी झाले आणि वादामध्ये पडलेल्या छबू देवकर यांचा मुलगा मिठू देवकर आहे जखमी झाला आहे.