Crime

Jalna : आमदार अर्जुन खोतकर प्रकरणामध्ये दोघांना अटक ; तालुका पोलिसांची कारवाई

पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी याबाबत माहिती दिली असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Published by : Shamal Sawant

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि मुलगा अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नांदेड आणि पुणे येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अटक केलेल्यांमध्ये सतीश पांडुरंग शिंदे (रा. हिमायतनगर, जि. नांदेड) आणि आंतेश्वर बाबू मुंडकर (रा. पुणे) यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी याबाबत माहिती दिली असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी :

जालना शहरातील एका अल्पवयीन मुलाने आमदार अर्जुन खोतकर आणि स्वर्गीय गजू तौर यांचा एकत्रित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या व्हिडिओवर खोतकर आणि अभिमन्यू खोतकर यांना थेट जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या कॉमेंट्स आल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.

यासोबतच, खोतकर आणि तौर यांचे जुने व्हिडिओही तपासण्यात येत आहेत आणि त्यावरील प्रतिक्रियांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पुढील तपासासाठी ताब्यात घेतलेल्या दोन्ही व्यक्तींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?