Crime

Aryan Drugs Case | 24 वर्षीय ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात

Published by : Lokshahi News

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आलेले आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अभिनेत्री अनन्या पांडेदेखील आर्यन खानच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे. ही माहिती समोर येताच आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. तपासादरम्यान आर्यन खानची व्हॉट्सअॅप चॅटिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे.

मात्र आता क्रूज ड्रग्ज प्रकरणी 24 वर्षीय मुख्य संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समजत आहे. त्याला एनसीबीने ताब्यात घेतलंय. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आणखी 2 जणांची एनसीबी चौकशी होणार आहे. पण ताब्यात घेण्यात आलेला तरुण नेमका कोण आहे, याबाबत माहिती देण्यास एनसीबीने नकार दिलेला आहे. तरुणाची चौकशी सुरु आहे. योग्य वेळेस मीडियाला माहिती देण्यात येईल, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर