Crime

Aryan Khan Drug Case: कोण आहे अनन्या पांडे?

Published by : Lokshahi News

शाहरूख खानचा लेक आर्यन खान (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drug Case) तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे.

गुरूवारी एनसीबी अधिकारी अनन्याच्या घरी धडकले. पाठोपाठ शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्यावरही एनसीबी अधिका-यांनी छापेमारी केली. आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत.

क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणं झालं होतं. ही अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचं समजतंय. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज एनसीबी अधिका-यांनी अनन्याच्या घरी छापेमारी केली. अनन्याच्या घरी छापामारी केल्यानंतर एनसीबीने दुपारी 2 वाजता अभिनेत्रीला चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे.

अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया