11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात सुमारे 7 वर्षे सुरू होती. या खटल्यात न्यायालयाने सुमारे 80 साक्षीदार तपासले आहेत. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले. कुरुंदकरसह 5 जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता न्यायालयाचा निकाल समोर आला आहे.
अश्विनी बिद्रे प्रकरणातील आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच अन्य दोन आरोपींची महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांची सात वर्षांची शिक्षा पूर्ण झाली झाली असून सुटका होणार असल्याचेदेखील समोर आले आहे.