सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील सचिन स्वामी या युवकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि माने कुटुबियांच्या अन्याला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला गेला मात्र पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या युवकाला वेळीच रोखत हा प्रयत्न हाणून पाडल्याने पुढील अनर्थ टळला. अचानक घडलेल्या या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या अंगावर पाण्याचे फवारे मारून त्यास शहर पोलीस ठाण्यात घेवून गेले आहेत.