बंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या राकेश खेडेकरने त्याचीच पत्नी गौरी खेडेकरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नी व पत्नी यांच्यामध्ये भांडण झाल्याने राकेशने गौरीची चाकूने वार करुन हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला. दरम्यान त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र आता त्याचा या सगळ्या प्रकारावरील जबाब समोर आला आहे.
गौरी आणि राकेश हे कामानिमित्त मुंबईहून बंगळुरूला शिफ्ट झाले होते. मात्र दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. अनेकदा गौरी मुंबईला परत येण्यासाठी आग्रहदेखील करत असे. अशातच 26 मार्च रोजी दोघांमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद झाला. या भांडणाच्या वेळी गौरीने सौरभला चाकू दाखवला. नंतर राकेशने रागाच्या भरात तोच चाकू गौरीच्या मानेवर फिरवत तिची हत्या केली. या प्रकरणाचा जबाब सौरभने पोलिसांना दिला आहे.
राकेशने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. गौरीची हत्या केल्यानंतर राकेश रात्रभर तिच्या मृतदेहाशी बोलत बसला होता. 'ए गौरी तू माझ्याशी का भांडलीस ?, तुला बंगळुरूमध्ये आल्यानंतर इतका राग का आला होता? , असं तो मृतदेहाशी बोलत असल्याची माहिती राकेशने पोलिसांना दिली.गौरीने रात्रीच्या जेवणासाठी भात आणि कुर्मा बनवला होता. पण दोघांमध्ये वाद झाल्याने दोघंही जेवले नव्हते. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कुकरमध्ये भात तसाच असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या तपासामध्ये राकेशने गौरीच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले. त्याने ही सर्व माहिती स्वतः कुटुंबातीला लोकांना दिली. नंतर मुंबईला येत असताना त्याने रस्त्यातच फिनाइलचे सेवन केले. नंतर राकेशची शुद्ध हरपली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.