BIHAR FATHER MURDERS 1.5-YEAR-OLD SON AFTER WIFE REMARRIES, SHOCKS DARBHANGA VILLAGE 
Crime

Crime News: बायकोच्या दुसऱ्या लग्नामुळे नवरा संतप्त, बापाने राक्षस बनून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला बुडवून ठार मारले

Darbhanga News: दरभंग्यात पत्नीच्या दुसऱ्या लग्नामुळे संतप्त पतीने दीड वर्षाच्या मुलाचा खून केला. बुलडोझर खड्ड्यात बुडवून मारल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

Published by : Dhanshree Shintre

बिहारच्या दर्भंगा जिल्ह्यातील भालपती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाजिला गावात पत्नीच्या दुसऱ्या लग्नामुळे संतापलेल्या चंदन साहनीने (२८) आपल्या दीड वर्षाच्या मुलाची क्रूर हत्या केली. आरोपीने मुलाला बुलडोझरने खोदलेल्या खड्ड्यात बुडवून मारले आणि मृतदेह तसाच टाकून घरी परतला. या खळबळजनक घटनेने कुटुंब आणि ग्रामस्थांना धक्का बसला असून, पोलिसांनी चंदनला अटक केली आहे.

वृत्तानुसार, चार वर्षांपूर्वी चंदनने गावातील चांदनी कुमारीशी लग्न केले. लग्नानंतर दोघे हिमाचल प्रदेशात मजुरीसाठी गेले, जिथे त्यांना एक मुलगी आणि नंतर दीड वर्षांचा मुलगा झाला. चंदनने दोन्ही मुलांना गावी आजी-आजोबांकडे सोडले. दरम्यान, चांदनीचा हिमाचलमधील एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू झाला. तिने चंदनला सोडून प्रियकराशी दुसरे लग्न केले, ज्यामुळे चंदन दुःखी होऊन गावी परतला.

गेल्या सोमवारी रात्री चंदनने मुलाला 'फिरायला' घेऊन बाहेर पडला आणि बुलडोझर खड्ड्यात बुडवून हत्या केली. मृतदेह तसाच टाकून तो घरी परतला. कुटुंबाने मुलाचा शोध घेतला, पण चंदनने सर्वांना गोंधळात टाकले. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी कठोर चौकशी केल्यानंतर त्याने हत्या कबूल केली. मुलाचे आजोबा रामसोगरथ साहनी यांच्या तक्रारीवर भालपती पोलिसांनी चंदनला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, पत्नीने सोडून दिल्यामुळे आरोपी मानसिक तणावात होता आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा