पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराबद्दलचे अनेक पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. अशातच आता भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा करणार? याबद्दलही सांगितले आहे.
तरुणीवरील अत्याचाराबद्दल काय म्हणाल्या चित्रा वाघ?
स्वारगेटमध्ये घडलेली घटना अत्यंत क्लेशदायी आहे. यामुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी सूचना परिवहन मंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. अडचणीत असताना आवश्यक हेल्पलाईन नंबरची जनजागृती करावी. ध्वनिक्षेपकच्या माध्यमातून घोषणा करावी ही मागणी केली आहे. त्याचप्रमाणे बस पार्किंग मध्ये असताना दरवाजे व खिडक्या बंद केल्या पाहिजेत आशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बंद बसेसमध्ये सुरक्षा अधिकारी आढावा घ्यावा. एसटी असलेल्या ठिकाणी गस्त घातली पाहिजे. या सर्व प्रकारानंतर 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन सरकारने तात्काळ केले आहे. मात्र याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीची बैठक परिवहन मंत्री घेत आहेत. पण या सगळ्यावर या सूचनांवर ते काम करतील अशी अपेक्षा आहे.
पोलिसांच्या कारवाईबद्दल केलं भाष्य
तक्रार करूनदेखील पोलिसांनी का काम केले नाही याबद्दल माहिती घेणार आहे. काल लगेच कारवाई करत सुरक्षारक्षकांना एका दिवसांत निलंबित केले गेले. पण या प्रकरणामध्ये जर कोणीही टाळाटाळ करत असेल तर त्यांना निलंबित करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर केले भाष्य
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री असताना गोंधळ घालण्याची गरज नाही. काही तासात हा आरोपी पकडला जाईल. त्याला शोधण्यासाठी 8 टीम गेल्या आहेत. तसेच कोणताही कायदा येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. काही कायद्यांमध्ये बदल होणं गरजेचं आहे.
संजय पवारांवरही केलं भाष्य
संजय राऊतांनी न बोललेलं बरं. मी तीव्र निषेध करते. लाडक्या बहीणींबाबत बोलण्याची लायकी नाही. तुम्ही बहिणीला शिव्या कशा देऊ शकता? ज्या महिलेबरोबर तुम्ही वर्षानुवर्षे काम केले आहे त्याबद्दल बोलताना तुमची जीभ कशी जड झाली नाही. तुम्हाला बोलायची नैतिकता नाही. नाहीतर लाडक्या बहिणी तुम्हाला चोप देतील. महिला म्हणजे पायातील चप्पल समजता, घाणेरड्या शिव्या देतात, सहकारी बाबत वाट्टेल ते बोलतात त्यांना महिलांबाबत बोलायचा अधिकार नाही. महिलांबाबत जास्त बोलू नका नाहीतर भविष्यात चप्पल खावी लागेल