Dombivli Crime Dombivli Crime
Crime

Dombivli Crime : डोंबिवली हादरली! 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला सुटकेसमध्ये

डोंबिवलीत सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ

Published by : Riddhi Vanne

डोंबिवलीतील डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पलावा सिटीजवळील देसाई नगर परिसरात खड्ड्यातील ब्रिजच्या खाली एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक तपासात ही सुमारे २५ वर्षीय तरुणी असल्याचं समोर आलं आहे. मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून खाडीत टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत असून ही हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून खाडीकिनारी फेकल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी सापडलेल्या परिस्थितीनुसार ही सुटकेस येथेच टाकण्यात आली होती की खाडीच्या पाण्याबरोबर वाहत येऊन ब्रिजजवळ अडकली, याबाबतची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

डायघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रं वेगात फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, सुटकेसवरील तांत्रिक पुरावे आणि महिलेच्या ओळखीशी संबंधित धागेदोरे मिळवण्यासाठी सर्व दिशांनी चौकशी सुरू आहे. ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळाकडे धाव घेतली, तर पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला. या निर्घृण हत्येमुळे डोंबिवली-पलावा परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींचा शोध लागत, घटनामागील संपूर्ण सत्य उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा