Crime

भाड्याने घेतले दुकान, भरदिवसा भिंत फोडून घातला ज्वेलर्सवर दरोडा

Published by : left

अमोल धर्माधिकारी, पुणे | पुण्यात एका ज्वेलर्सवर (Robbery at jewelers) आज मोठा दरोडा पडला.माऊली ज्वेलर्स (mauli jewellers) हा दरोडा भरदिवसा पडला आहे.चोरांनी हा दरोडा टाकण्यासाठी फार मोठी प्लानिंग केली होती. आधी ज्वेलर्सच्या जवळच दुकान भाड्याने घेतले. त्यानंतर दोन्ही दुकानातली भिंत फोडून दरोडा टाकला. त्यामुळे चोरांची ही शक्कल पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

वारजे माळवाडी एन डी ए रस्त्यालगत गणपती माथ्याच्या येथे माऊली ज्वेलर्स (mauli jewellers) सराफी दुकान आहे. याच दुकानाच्या शेजारी असलेले दुकान आरोपींनी भाड्याने घेतले होते. याच दुकानातून ज्वेलर्स (mauli jewellers) फोडण्याची तयारी केली होती. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दुकानाचे मालक हे दुकान बंद करून जेवणासाठी गेले असता, चोरट्यांनी भिंत फोडून दुकानात प्रवेश करीत दागिने लांबवले. यामध्ये चोरट्यांनी तब्बल 30 लाखाचे दागिने लंपास केले.

दुपारी अडीच ते पाच वाजण्याच्या दरम्यान भर दुपारी हे दुकान फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाचा तपास वारजे पोलीस करत आहे. तसेच या प्रकऱणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा