Crime

Satara Doctor Suicide Update : 'लॉक उघडून ती आतही गेली, हॉटेलमध्ये जाताच...', सीसीटीव्हीत 'ते' दृश्य समोर! सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवा छडा लागला आहे. अखेर त्या हॉटेलचा सीसीटीव्ही पुटेज समोर आला असून यावेळी ती आत गेली अन्, धक्कादायक दृष्य समोर आलं आहे.

Published by : Prachi Nate

फलटणमध्ये एका तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही डॉक्टर फलटणमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मृत्यूपूर्वी तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत. बदने याने अत्याचार केला, तर बनकर याच्याकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे तिने नमूद केले.

घटनेनंतर या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. प्रशांत बनकरला याआधीच अटक करण्यात आली होती, तर गोपाळ बदने हा पोलिसांसमोर हजर झाला असून त्यालाही अटक करून न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या तपासात पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला असून, ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींच्या घरांची झाडाझडती घेऊन डिजिटल पुरावेही ताब्यात घेण्यात आले. महिलेने सुसाईड नोटमध्ये 4 वेळा अत्याचार झाल्याचे नमूद केले असून, त्याबाबत सविस्तर तपास सुरू आहे.

आत्महत्येमागची अन्य कारणेही होती का? डॉक्टर आणि आरोपींची आत्महत्येपूर्वी काय चर्चा झाली? अशा विविध प्रश्नांचा तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यावेळी “डॉक्टर हॉटेलमध्ये एकट्याच आल्या, एकट्याच रूममध्ये गेल्या आणि रूम लॉकही आतूनच केला गेला,” असं प्राथमिक निष्कर्ष पोलिसांकडून मिळत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा