Crime

आष्टी शहीद येथे बांधकाम मजुराची हत्या; पोत्यात भरून रस्त्यावर फेकला मृतदेह

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे | वर्धा : आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज (4 फेब्रुवारी ) सकाळच्या सुमारास नागरिकांना पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळून आला. पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आलाय. असा रहस्यमय रित्या मृतदेह आढळून आल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली. मृतदेह बांधकाम मजुराचा असून त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा केला जात आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मृतकाच्या घरापासून अगदी 50 मीटर अंतरावर पोत्यात भरून मृतदेह फेकण्यात आला आहेय. घातपात करीत मृतदेह पोत्यात भरून विल्हेवाट लावल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहेय. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून दूर फेकण्यासाठीचा प्रयत्न झालाय. पण वजन जास्त असल्याने मध्येच ठेऊन पळ काढला असावा असा कयास लावला जात आहेय. मृतकाचे नाव जगदीश भानुदास देशमुख असे आहे. जगदीश हा गवंडी कामगार असून अतिमद्यप्राशन असल्याने घरातही वादविवाद करत असल्याची माहिती आहेय.नेमकी हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी हे पोलीस तपासात समोर येणार आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून नागरिकांत तर्कवितर्क काढले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्याचं आणखी एक निमंत्रण समोर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार