पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीनं पुन्हा तोंड वर काढल आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री गुन्हेगारी ठेचून काढू असं सातत्यानं म्हणत असले तरी, तरीही पुणे शहरात गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. पुण्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांवर आहे. मात्र मोठ्य प्रमाणात पोलीस राजकारणी आणि व्हीव्हीआयपींच्या बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं समोर येत आहे.
अशातच पुण्यात गणेश काळे हत्या प्रकरण जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर सामना अग्रलेखातून पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य करण्यात आलं आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहले आहे की, "पुण्याने आता हादरणे सोडून दिले आहे. अलीकडच्या काळात इतक्या गुन्हेगारी घटनांचे आघात पुण्यावर होत आहेत की, ‘खून’, ‘मारामाऱ्या’, ‘टोळी युद्ध’, ‘कोयता गँग’ वगैरे शब्दांना आता पुणेकर सरावले आहेत. एका घटनेतून सुन्न होऊन स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा दुसरी त्यापेक्षा धक्कादायक घटना पुण्यात घडलेली असते. पुणे परिसरात वाढलेले गुन्हेगारीचे प्रकार पाहता सिनेमातील थरारक प्रसंगही फिके पडतील".
"कोंढवा येथे शनिवारी भरदिवसा 22-23 वर्षांच्या पोरांनी गणेश काळे या तरुणाची क्रूरपणे हत्या केली. मारेकऱ्यांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या घातल्या आणि नंतर डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारले. पुण्यातील बहुचर्चित आंदेकर व कोमकर यांच्यातील टोळी युद्धातून ही हत्या करण्यात आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या एक वर्षापूर्वी झालेल्या खून प्रकरणापासून या दोन्ही टोळ्या सुडाने पेटल्या आहेत व त्यातूनच कधीकाळी मुंबईत भडकलेल्या गँगवॉरप्रमाणे पुण्यात टोळी युद्ध भडकले आहे".
"शनिवारी ज्या गणेश काळेची हत्या झाली, तो वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. रिक्षाचालक असलेला गणेश कोंढव्यातील अत्यंत गजबजलेल्या खडी मशीन चौकात पेट्रोल पंपाजवळ थांबलेला होता. चौकात प्रचंड गर्दी असतानाही टोळीने आलेले हल्लेखोर जराही कचरले नाहीत. याला म्हणतात पुणे पोलिसांचा ‘वचक’! टोळी युद्धातील खुनी खेळाची ही पहिलीच घटना नाही. याआधी वनराज आंदेकरच्याच हत्येचा बदला घेण्यासाठी गुंडांनी आयुष कोमकर या महाविद्यालयीन तरुणाचा खून केला. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठसारख्या भरवस्तीत आंदेकरच्या खुनाचा आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुषलादेखील असेच गोळ्या घालून संपविण्यात आले. टोळी युद्धातून..."