Crime

Walmik Karad : शुगर डाऊन, बोलायला त्रास...तुरुंगाबाहेर राहण्यासाठी वाल्मीक कराडची धडपड ? नक्की काय आहे सत्य

मात्र आता वाल्मीकच्या आजारपणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Published by : Shamal Sawant

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली होती. वाल्मीक कराडची शुगर लेव्हल अचानक कमी झाल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला बोलण्याचादेखील त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले.

डॉक्टर काय म्हणाले ?

मात्र आता वाल्मीकच्या आजारपणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तुरुंगातून बाहेर राहता यावं यासाठी वाल्मीक कराड नाटक करत असल्याचा संशयदेखील व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी वाल्मीक कराडला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला लगेच बीड जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन करण्यासाठी दाखल केले. मात्र त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वाल्मीक कराडला काय त्रास झाला ?

शुगर डाऊन झाल्याने वाल्मीकला स्पष्ट बोलताना त्रास होत होता. त्याला अडखळल्यासारखं होत होतं. वैद्यकीय टीमने कारागृहात तपासणी केल्यानंतर सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. त्याचा रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला. वाल्मीकचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचा वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र वैद्यकीय तज्ज्ञ इतर तपासण्यांचा अहवाल पाहूनच आता वाल्मीक कराडवरील पुढील उपचाराची दिशा ठरणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा