जालनामध्ये एक धक्कादायक घडटना घडली आहे. सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सासु-सुनेचं नातं हे आई आणि मुली प्रमाणे मानले जाते. मात्र जालनामध्ये सुनेनेच आपल्या सासूचा जीव घेतला आहे. नवरा कामानिमित्त बाहेर आहे ही संधी साधून सुनेने हे कृत्य केलं आहे.
भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत सकाळी सुनेने भिंतीवर डोक आपटून सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सविता शिंगारे वय 45 वर्ष असं मयत महिलेचं नाव आहे. सुनेने सासूची हत्या करून, हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार झाली होती. यानंतर जालना पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिनगारे हिला परभणीतून ताब्यात घेतलं आहे.