Dead found inside a well in Hingoli 
Crime

वाढोना शिवारातील विहिरीत आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Published by : Vikrant Shinde

गजानन वाणी (हिंगोली) – सेनगाव तालुक्यातील वाढवना परिसरात विहिरीत विहीरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटली असून, ती व्यक्ती शिवाजी काटकर राहणार पानकन्हेरगाव असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,सेनगाव तालुक्यातील वाढोना शिवारातील एका विहिरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना आज दुपारच्या सुमारास मिळाली होती घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने घटना स्थळी धाव घेऊन पोत्यात असलेला मृतदेह बाहेर काढून मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु केले असता मयत व्यक्ती शिवाजी काटकर रा. पान कन्हेरगाव येथील असल्याचे सिद्ध झाले आहे.

शिवाजी काटकर हे 15 फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची नोंद सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्या नंतर आज दुपारी वाढोना परिसरातील एका विहिरी मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला असून हा मृत्यू घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून यासंदर्भात पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा