डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणात पीडित मुलीचा कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केल्यांतर आरोपीचा विरोधात गून्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग ( १९ ) अटक आरोपीचे नाव आहे.
डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येत होते. 15 जानेवारी रात्री आठ वाजता पिडीत मुलगी आरोपी याच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती, तेव्हा आरोपी वैभव याने पिडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमच्या दरवाजाची कड़ी आतुन लावून पिडीत मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटना बद्दल कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग, विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.