Crime

उल्हासनगरात पोलिसांच्या ड्रग पेडलरला बेड्या

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव
राज्यात क्रूझ पार्टी प्रकरण गाजत असतानाच उल्हासनगरमध्ये पोलिसांनी एमडी ड्रग विकण्यासाठी आलेल्या ड्रग पेडलरला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून विक्रीसाठी बाळगलेलं ८ ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले.

उल्हासनगर शहरात ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने शुक्रवारी उल्हासनगरच्या शांतीनगर वेलकम गेटजवळ सापळा रचला. यावेळी संशयित ड्रग पेडलर दिसताच त्याच्यावर झडप घालत पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात विक्रीसाठी आणलेलं ८ ग्रॅम मेफेड्रोन पावडर हे ड्रग आढळून आलं.

चंद्रहास शेट्टी उर्फ इमू असं या ड्रग पेडलरचं नाव असून त्याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एनडीडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा