Crime

दाऊद कनेक्शन : डोंगरीतून 1500 कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्जविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. यामध्ये ड्रग्ज सिंडिकेट समोर आल्यानंतर तस्करांच्या नाड्या आवळण्यासाठी एनसीबीने पाऊल उचलले. बॉलिवूडचे अनेक सितारे जाळ्यात अडकले. आता या ड्र्गज् रॅकेटचे कनेक्शन थेट कराचीत लपलेल्या दाऊदपर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले.
चिंकू पठाण याला नवी मुंबईतून अटक केल्यानंतर या ड्रग्ज प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या ड्रग्ज प्रकरणात दाऊद जिथे राहायचा त्या डोंगरीत छापेमारी झाली आणि तेथून तब्बल पंधराशे कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. समुद्रातून होणाऱ्या या तस्करीतून जो पैसा मिळतो तो थेट दाऊदच्या तिजोरीत जातो आणि हाच पैसा दहशतवादी कृत्यांसाठी वापरला जातो. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयच्या वरदहस्ताने दाऊदचे हे साम्राज्य टिकून आहे. डॉनला जेरबंद करण्यासाठी त्याची रसद बंद करणे, आवश्यक आहे.

भाजपाची टीका
महाविकास आघाडी सरकारने अंमली पदार्थांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे. वांद्रे, खार, सांताक्रूझमधील ड्रग्ज हॉटस्पॉट्ससंदर्भात मुंबई पोलिसांना पत्र लिहिले असल्याचे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
मुंबईत अंमली पदार्थाचे कारखाने उभे राहत असताना राज्याचे गृहमंत्री झोपा काढत आहेत काय?, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली. आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून राज्याचे गृहमंत्री केवळ सूडाचे राजकारण करण्यात मग्न आहेत, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा