Crime

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने केली स्वत:च्या आई-वडिलांची हत्या, थरकाप उडवणारा घटनाक्रम

नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने स्वत:च्या आई-वडिलांची हत्या केली. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या दुहेरी हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे.

Published by : shweta walge

नागपूर शहरातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड उघडकीस आलाय. पोटच्या गोळ्यानेच स्वतःच्या आईवडिलांना संपवल्याचं तपासात उघड झालं आहे. लीलाधर डाकोडे आणि अरुणा डाकोडे असे हत्या झालेल्या आई वडिलांचे नाव आहे. लीलाधर आणि अरुणा यांचा मुलगा उत्कर्ष यानेचं आई वडिलांची हत्या केली आहे.

आरोपी उत्कर्ष डाकोळे इंजिनिअरिंगच विद्यार्थी होता. गेल्या 6 वर्षांपासून तो इंजिनिअरिंग पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आई वडिलांनी त्याला अन्य दुसऱ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्याचा सल्ला वारंवार देत होते. त्यामुळे आरोपी उत्कर्ष बेचेन राहू लागला होता. आई-वडिलांनी आरोपी उत्कर्षला शेती करण्यासाठी किंवा अन्य व्यवसाय करण्यासाठी तगादा लावला होता, त्याच कारणाने राग अनावर झाल्याची कबुली आरोपी उत्कर्षणे पोलिसांना दिली आहे.

२६ डिसेंबरला आरोपीने सुरुवातीला दुपारी एक वाजता दरम्यान आईचा गळा आवळून हत्या केली त्यानंतर तीन तासाने वडिल घरी आल्यावर चाकूने वार करुन वडिलांची केली. मृतक लीलाधर डाकोळे कोराडी पॉवर प्लांटमधून सेवा निवृत्त झाले होते. तर अरुणा या शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्षला आई वडिलांना मागितल ते दिलं मात्र रागाच्या भरात हे घडल्याने आता आरोपीला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप येत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितलय.

उत्कर्षने आईवडिलांची हत्या 26 डिसेंबर रोजी केली, त्यावेळी त्याची बहीण ही कॉलेजला गेली होती. मात्र, ज्यावेळी ती घरी परत आली तेव्हा आई-वडील मेडिटेशन करिता बंगलोरला गेले असल्याचा बनाव आरोपीने रचला आणि तिला काकाच्या घरी सोडून दिले. या सात दिवसांमध्ये आरोपी उत्कर्षने बहिणीला तिच्या घरी जाऊ दिले नाही, त्यामुळे हे हत्याकांड उघडकीस येण्यास उशीर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा