Crime

विवाहबाह्य संबंध; पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे | वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहिद येथील नवीन आष्टीच्या वस्तीत आज पहाटे पोत्यात बांधून असलेला मृतदेह फेकलेला आढळल्याने खळबळ उडाली होती. काही वेळातच मृतदेहाचे ओळख पटली. जगदीश भानुदास देशमुख असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी जगदीशच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली असून तपासानंतर सहभागी असलेल्या इतर जणांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पोत्यात बांधून मृतदेह फेकलेला आढळला. या व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह फेकून दिल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे.मृतदेहाचा ओळख पटवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.अवघ्या काही तासातच पत्नी दीपाली जगदीश देशमुख हिला व प्रियकर शुभम भिमराव जाधव यांना ताब्यात घेतले. दोघांनी हत्या केल्याची कबुली दिली.

शुभम याचे जगदीशच्या पत्नीसोबत विवाहबाह्य प्रेम संबंध होते. जगदीश हा दारूच्या व्यसनाधीन असल्याने पत्नीसोबत वादविवाद करायचा. त्यामुळे पत्नी त्रासलेली होती. त्यामुळे त्याची हत्या करण्याचा कट रचला त्यादिवशी पत्नीचा प्रियकर हा मृतकाच्या घरी झोपला होता, दोघांनी हत्येचा कट रचून जगदीशच्या डोळ्याजवळ व कमरेवर लाकडी रॅपने मारहाण करुन दुखापत केली व त्याचा गळा आवळून खून केला. ही घटना 3 व 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. हत्येचा पुरावा लपवण्याचा उद्देशाने मृतदेह लपवण्यासाठी पोत्यात बांधून घराजवळच्या रस्त्याच्या काठावर नालीजवळ आणून फेकून दिला होता. या प्रकरणाचा उलगडा झाल्याने दीपाली जगदीश देशमुख व तिचा प्रियकर शुभम भीमराव जाधव याला अटक केली असून तपास सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंकी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, उपनिरीक्षक देरकर,शेख नबी ,बालू वैराळे, राहुल तेलंग, संजय बोकडे उपस्थित होते.

आष्टी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला गुन्ह्याचा छडा

सकाळच्या सुमारास नवीन आष्टी वस्तीत पोत्यात बांधून असलेला मृतदेह आढळल्याची पोलिसांनी माहिती दिली, यात मृतकाचा ओळख पटल्याने आष्टी पोलिसांची सूत्रे हलविली आणि मृतकाच्या पत्नीला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले, आणि घटनेचा अवघ्या काही तासातच उलगडा लागला.आणि दोघांना अटक केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता