Crime

Buldhana Farmers : राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानी होळीच्या दिवशी उचलले टोकाचे पाऊल

बुलढाणा जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श युवा शेतकरी कैलास नागरे यांनी होळीच्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल. शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी जीव संपवला आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Prachi Nate

होळीच्या दिवसी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावच्या प्रगतशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला युवा शेतकरी कैलास अर्जून नागरे यांनी आज आपल्या शेतात विषारी औषध पिऊन जीव दिला आहे. त्यापुर्वी त्यांनी एक पत्र देखील लिहलेलं आहे. कैलैस नागरे या तरुणाने गेले अनेक दिवसांपासून देऊळगाव येथील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा लढा सुरु केला होता. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी जीव देत असल्याच त्यांनी पत्रात लिहलं आहे. तसेच यावर आता राजकीय प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे.

फडणवीसांनी आता मुळ समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा - हर्षवर्धन सकपाल

याचपार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सकपाल म्हणाले की, "नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पामुळे शेतकरी वर्गावर अतिशय निराशजनक चित्र निर्माण झालं आहे आणि त्याचाच हा बळी आहे. आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवानी बाब दुसरी कोणतीही नाही. देवेंद्र फडणवीसांनी आता तरी त्यांचा मुळ समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलावा. ज्या मुळ समस्या आहेत त्यांना बगल देण्याकरता ते कुठे तरी तालीबालीचे वक्तव्य करतात. कुठे दोन जातींना दोन धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुळ विषयांपासून ते पळ काढत आहेत. त्याचा परिणाम नागरेंसारख्या शेतकऱ्यांवर होतो आणि त्यांना स्वतःचा जीव देऊन त्याचे मोल चुकवावे लागत आहे".

शेतकऱ्याने सरकारला दोषी ठेरवल आहे - नाना पटोले

तसेच नाना पटोले म्हणाले की, "शेतकऱ्यांना उद्धवस्थ करण हे तुमच धोरण आहे. आज होळीच्या दिवशी एका सेतकऱ्याने आत्महत्या करण हे महाराष्ट्रासाठी हादरवणारी गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्याला सन्मानित केलं गेलं असा शेतकरी सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारवर दोष ठेवलं आहे. सोमवारी हा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडू. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचा आवाज आम्ही मांडू. यावर सरकारने आपली भूमिका मांडावी. राज्यपालाच्या अभिभाषणात सरकार आम्ही शेतकऱ्याला भरपूर दिलं असं सांगतात मात्र यांनी काहीच दिल नाही".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज