Crime

Pune Crime : पुण्यात वर्दीच धोक्यात! चक्क पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर चार तरुणांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Published by : Prachi Nate

खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर चार तरुणांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिनीवर पाडून पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली असून, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी भागात 31 जुलैच्या रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चर्च चौकाजवळ मार्शल ड्युटीवर असलेले दोन पोलिस कर्मचारी आपली नेहमीची गस्त घालत होते. दरम्यान, एका वाहनचालकाने वाहन अतिशय वेगात आणि बेशिस्तपणे चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित वाहन थांबवून विचारणा केली असता, वाहनातील चौघांनी संतापून दोघांवर अचानक हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पोलिसांना जमिनीवर पाडण्यात आले आणि त्यांना बेदम झोडपण्यात आले.

या घटनेनंतर जखमी पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्वरेने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जुनेद इक्बाल शेख (27), नफीज नौशाद शेख (25), युनूस युसुफ शेख (25) आणि आरिफ अक्रम शेख (25) यांचा समावेश आहे. फक्त वाहन शिस्तीत चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरूनच पोलिसांवर हात उचलल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींवर सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की, सार्वजनिक सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पोलिसांवरच जर असे हल्ले होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे चित्र नेमके काय आहे? काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, तरीही अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahavitaran Jobs : महावितरण मेगा भरती, आता होणार इतक्या पदांची भरती

Sunil Tatkare : "अजित पवार मुख्यमंत्री..." सुनील तटकरे मोठं विधान

Malegaon Blast Case : 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक वक्तव्य

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा