मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री उर्मिला कोठारे पुन्हा चर्चेत आली आहे. २८ डिसेंबर २०२४ रोजी उर्मिलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये मेट्रोचं काम करणाऱ्या दोन कामगारांना गाडीने उडवलं. त्यामध्ये एक कामगार गंभीर जखमी असून दुसऱ्याचा कामगाराचा मृत्यू झाला होता. या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मात्र पोलिसांच्या तपासावर उर्मिला नाराज असल्याचे दिसत आहे. याबाबत तिने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अपघाताचा पुढील तपास सीआयडी किंवा अन्य यंत्रणेने करावा, अशी मागणी उर्मिलारेने केली आहे.
२८ डिसेंबरला मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे शुटींग संपवून घरी जात होती. कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ उर्मिलाच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात मेट्रोच्या दोन कामगारांना तिच्या कारने उडवले. पोलिसांनी ड्रायव्हर गजानन पाल याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. परंतु या तपासावर उर्मिला नाराज असल्याचे समजत आहे.
उर्मिलाने मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका केली आहे. या याचिकेमध्ये "अपघात झाला त्या ठिकाणाचे सीसीटिव्ही फुटेज मिळाले नाहीत. तसेच पोलिस प्रशासन एका खाजगी कंपनीला मदत करत आहे. त्यामुळे अपघाताचा पुढील तपास सीआयडी किंवा दुसऱ्या यंत्रणेकडे द्यावी", अशी मागणी अभिनेत्री उर्मिली कोठारेने केली आहे.