नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या ओझर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचं बघून नराधमानी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नाशिकच्या ओझर पोलिस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.