Gujarat Crime News 
Crime

Shocking News: संतापजनक! खेळत असलेल्या चिमुकलीचे अपहरण; बलात्कार न करु शकल्याने गुप्तांगात घातला रॉड

Gujarat Crime News: गुजरातच्या राजकोटमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला.

Published by : Dhanshree Shintre

गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात निर्भया प्रकरणासारखीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दाहोद जिल्ह्यातील एका कुटुंबाची सहा वर्षांच्या मुलगी राजकोट जिल्ह्यातील अटकोट पोलिस स्टेशन परिसरातील गावात शेतात खेळताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा अपहरण केला. आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ओरडल्याने तो थांबला. यानंतर संतापलेल्या आरोपीने रागाच्या भरात मुलीच्या गुप्तांगात धारदार रॉड घालून तिला गंभीर जखमी केले. मुलगी वेदनाने ओरडत होती, परंतु आरोपी तिला तिथेच सोडून पळून गेला.

मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला शोधले आणि काही वेळातच ती जवळच त्यांना आढळली. तिला गंभीर अवस्थेत राजकोटमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध सुरू केला. गुन्ह्याच्या तपासासाठी दहा पथके तयार करण्यात आली, ज्यांनी सुमारे १०० संशयितांची चौकशी केली. या तपासात मुलीने आरोपी राम सिंग तेरसिंगला ओळखले, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेने स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली असून अधिकार्‍यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा आश्वासन दिले आहे. ही घटना २०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देते, ज्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंड घातले गेले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा