गुजरात हायकोर्टाने अध्यात्मिक गुरु आणि अत्याचार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला तात्पुरता जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय कारणास्तव 30 जूनपर्यंत जामीन वाढवलाय. 2013 च्या बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
आसाराम बापूने उच्च न्यायालयात सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामीनासाठी याचिका दाखल केली होती. डॉक्टरांनी त्यांना पंचकर्म उपचार करण्याचा सल्ला दिला असल्याचा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला.
आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने त्यांच्या आश्रमातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. 2023 मध्ये गुजरातच्या एका न्यायालयाने त्याला 2013 मध्ये त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर वारंवार बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याला पुण्यात वैद्यकीय उपचारांसाठी अनेक वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला.