Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?  Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?
Crime

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

नोरा फतेहीसारखा फिगर मिळवण्यासाठी पतीचा पत्नीवर अमानुष छळ

Published by : Riddhi Vanne

Husband Tortured His Wife For Figure Like Nora Fatehi : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथील एका महिलेनं आपल्या पतीवर नोरा फतेहीसारखा फिगर मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, तिचा पती – जो की एक फिजिकल एज्युकेशन टीचर आहे. तिला रोज तीन तास जिममध्ये व्यायाम करण्यास भाग पाडायचा आणि तिला जेवण्याला देत नव्हता, जेणेकरून तिचं शरीर एक विशिष्ट प्रकारात रूपांतरित होईल. पीडित महिलेने सांगितले की, तिचा पती वारंवार तिच्या दिसण्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करायचा आणि म्हणायचा की ती ना पुरेशी उंच आहे, ना सुंदर; आणि त्यानं चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मार्च 2025 मध्ये पीडित पत्नीचे तिच्या नवऱ्यासोबत लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या पतीनं तिच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि आई-वडिलांच्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर त्याचं वागणं आणखी बिघडत गेलं. त्याला दिसायला सुंदर असणारी बायको पाहिजे होती. त्यामुळे तो तिला दररोज 3 तास जिम करायला लावत होता. दरम्यान तिला जेवायला देत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, सासू-सासरे तिला आणि तिच्या पतीला एकत्र बाहेर फिरायला कधीच परवानगी देत नसत.सासू घरकामावरून सतत ओरडायची, सासरे पुन्हा पुन्हा अधिक पैशांची मागणी करायचे. पीडितेच्या कुटुंबियांनी लग्नासाठी सुमारे 75 लाख खर्च केला होता. यामध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ कार, 24 लाखांची रोख रक्कम व दागदागिने यांचा समावेश होता. एवढा खर्च करूनही, पीडितेला रोज मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू