बुलढाणा जिल्ह्यात गाय चोरीच्या संशयावरुन दलित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. यावेळी तरुणाला धर्म विचारत तीन तरुणांकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी गब्बू गूजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले, रोहित पगारीया या तीन युवकांनी बस स्थानकासमोर पत्ता विचारण्याच्या नावाखाली तरुणाला पकडून गाडीवर बसवले, व त्याला शहरातील काँग्रेस भवनच्या मैदानावर घेऊन गेले.
त्यानंतर युवकाचे कपडे काढून धर्म विचारला आणि त्याला मारहाण करण्यात आली. बुलढाण्यातील खामगाव शहरात ही धक्कादाय घटना घडली आहे. रोहन पैठणकर असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या मारहाणीत दलित तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घडलेल्या घडनेवर पोलिसांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.