मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुलेश्वरच्या जय हिंद इस्टेटमधील एका इमारतीच्या कॉमन बाथरूममध्ये लघुशंका करताना महिलांचे आणि मुलींचे लपून चित्रीकरण 19 वर्षीय तरुण करत होता. त्याला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजनकुमार चौपाल (19) हे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीकडे दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ सापडले आहेत. आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) अटक केली आहे. हा तरुण मूळचा बिहारच्या मधुबनचा राहणारा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.